धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्स्फूर्तपणे साजरा


 नेरुळ (विशेष प्रतिनिधी प्रतिक यादव) - आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी समता बौद्ध मित्र मंडळ संचालित चैत्यगिरी बुद्ध विहार नेरूळ पूर्व, नवी मुंबई  येथे चौदा ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच पंधरा ऑक्टोबर सम्राट अशोका विजयादशमी हा मूळचा पारंपरिक बौद्धकालीन सण उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यावेळी नेरूळ पूर्व तसेच नेरुळ पश्चिम विभागातील अनेक बौद्ध नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सकाळी साडेदहा वाजता सामूहिक बुद्ध वंदना व पंचांग प्रमाण घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी किशोरवयीन कार्यकर्ते रुथाइन खरात, वसंत सोरे यांचे चिरंजीव राजरत्न सोरे यांनी माईक हातात घेऊन कार्यक्रमाची धुरा सांभाळली. 

त्यानंतर आयु शशिकांत गाडे गुरुजी यांनी धम्म विषयावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक दादासाहेब जाधव यांनी सभेला बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया सेवेतील निवृत्त पदाधिकारी मिलिंद जाधव यांनी स्वतः रचना केलेली कविता सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याचप्रमाणे इतरही अनेक वक्ते व पदाधिकारी यांनी विविध विषयांवर ते जमलेल्या सर्व बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले. 

आजच्या कार्यक्रमात घडलेली विशेष गोष्ट म्हणजे नेरूळमधील धडाडीचे समाजसेवक व युवा कार्यकर्ते अश्विनकुमार स्के यांचे वडील अशोक धस्के माझगाव डॉक येथील सेवेतून निवृत्त झाले त्यावेळेस त्यांना दोन शब्द सांगण्यासाठी विनंती केली असता अश्विनकुमार यांनी त्यांचा अनुभव सांगत भावनाविवश होऊन त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू हे सर्वांनी याची देही याची डोळा पाहिले व कार्यक्रमाला जमलेले सर्व बौद्ध बांधव यांनाही हे चित्र पाहून गहिवरून आले. 

त्यानंतर समता बौद्ध मित्र मंडळाचे पदाधिकारी सचिन पगारे यांच्या पत्नी अर्चना पगारे यांनीही माइक घेऊन वर्षावास कार्यक्रमातील त्यांचा अनुभव सांगितला. पगारे ताई यांनी माईक घेऊन केलेल्या भाषणाबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांची प्रशंसा केली. 

त्याच्यानंतर  प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व भोजनदान करण्यात आले. आयु वसंत सोरे यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले. 

या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकारी  आयु बाबुराव इंगळे, विकास जाधव, सुदत्त खरात, स्वरणीम मोरे, प्रदीप भोसले, प्रशांत पवार, संतोष पगारे, प्रदीप माने, निखिल जाधव, अधिकराव सरगडे, दि.  सिम्पल टाइम्स आणि आंबेडकरिस्ट.पेज (Ambedkarist.page) चे मुख्य संपादक व बहुजन मुक्ती पार्टी चे  मुंबई दक्षिण मध्य लोकसभा 2019 चे उमेदवार बद्दी हेमंतकुमार रेड्डी व  इतर पदाधिकारी  यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 

त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी पदमा खरात, अलका मोरे,  सुवर्णा माने, सारिका सोरे, छाया गडकरी, लता गाडे,  चारुशीला सरदारे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशा प्रकारे अत्यंत आनंदमय वातावरणात धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोका विजयादशमी साजरे करण्यात आली.


"""" """ """ """ """" """ """ """ """ """ """ """ """ """" """ """ """

कृपया ऑनलाईन पेमेंटद्वारे तुम्हाला हवी तशी रक्कम देणगी देवून या न्यूज वेबसाइटला मदत करा

Please Help this News Website by Donating any amount as you wish through Online Payment by 

Google Pay or PhonePe No : 9224717727 

or UPI ID : 9224717727@apl

PayTM No : 7977884658

Regards

Hemantkumar Baddy - Chief Editor
..........................................☘☘☘